योगा घेतो आहे बड्या व्यवसायाचे रूप

business
शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी आचरणात आणण्याचा योगाभ्यास जगभरात बड्या व्यवसायाचे रूप घेताना दिसून येऊ लागला आहे. योगप्रशिक्षण, योगासाठीचे कपडे, अन्य सामग्री, मॅट अशा अनेक वस्तूंचा व्यापार जोरावर असून आत्ताच त्याची उलाढाल २५० अब्ज डॉलर्सवर असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात या व्यवसायाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी विविध सवेक्षणातून त्यासंदर्भातला अंदाज व्यक्त केला जात आहे. असोचेमच्या सर्वेक्षणानुसार भारतात योग व त्यासंदर्भातला व्यवसाय ३५ हजार कोटींच्या घरात आहे.

योगशिक्षकांची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून त्यात ३० ते ३५ टक्के वाढ दिसून येत आहे. अमेरिकेत योगप्रशिक्षणासाठी दरवर्षी ३ अब्ज डॉलर्स खर्च केले जात आहेत तर युरोपात योग स्टुडिओ मोठ्या संख्येने उघडले जात आहेत. योगशिक्षक विद्यार्थ्यांकडून तगडी फी आकारत आहेत त्याचप्रमाणे या क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

हेल्थ किलनिक. आयुर्वेद रिसॉर्ट, हॉलीडे कॅम्प, कार्पोरेट ट्रेनिंग अशा प्रकारचे व्यवसायही फोफावले आहेत तसेच स्पेशल योगथीम स्टोअर्सही उघडली जात आहेत. योगसंबंधी किमान ५०० उत्पादने आत्ता बाजारात उपलब्ध आहेत. वेलनेस ब्रँड व्हीएलसीसी ने देशात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत तर रिबॉकने योग कलेक्शन कपडे बाजारात आणले आहेत. ईबे व आर्ट ऑफ लिव्हिंग यांनीही आपली स्टोअर्स सुरू केली आहेत. ऑडिओ, व्हीडीओ, डीव्हीडीचा या क्षेत्रातील प्रवेश लक्षणीय रित्या वाढला आहे तसेच पर्यटन क्षेत्रातील यात्रा डॉट कॉमने विशेष योग पकेज देण्याची सुरवात केली आहे.

Leave a Comment