
नवी दिल्ली – मोबाईलद्वारे भारतात चीनच्या शाओमी कंपनीने जम बसविला असून आता अजून एक गॅझेट या कंपनीने बाजारात आणले असून भारतीयांची गरज ओळखून या कंपनीने एलईडी लाईट बाजारात आणली आहे. मुख्य म्हणजे या लाईटची किंमत फक्त १९९ रूपये आहे.
अवघ्या १९९ रूपयात चीनी शाओमीची एलईडी लाईट
आपल्या वेबसाईटवर शाओमीने आणलेल्या या नव्या लाईटची किंमत जाहीर केली आहे. हा एलईडी लाईट वापरण्यासही सहजसोपा आहे. तो कसाही वाकवता येतो. इतकेच नाही तर हा लाईट लॅपटॉपपासून यूएसबी चार्जरपर्यंत आणि पॉवर बँक चार्जरमध्येही लावून वापरता येऊ शकतो. रात्रीच्या वेळी लॅपटॉप वापरताना की – बोर्ड दिसण्यासाठी एलईडी लाईट उपयोगी ठरू शकते. तसेच अनेक कारणांसाठीही या लाईटचा वापर करता येईल.
