२५० किमीचे मायलेज देणारी कार

bmw
प्रसिद्ध जर्मन कंपनी बीएमडब्ल्यूने एक लिटर इंधनात तब्बल २५० किमीचे मायलेज देणारी कार बनविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला असून या कारचे नामकरण बिमर असे केले असल्याचे वृत्त आहे. भारतात आज सर्वाधिक मायलेज देणारी कार २७.६२ किमीचे मायलेज देणारी आहे. बीएमडब्ल्यूचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर वाहन क्षेत्रात क्रांती घडविणारा ठरेल असा जाणकारांचा होरा आहे.

बीएमडब्लूची बिमर ०.४ लिटरमध्ये १०० किमी जाईल. ही चार सीटर कार कार्बन फायबरचा वापर करून बनविली गेली आहे. त्यामुळे कारला मजबूत प्लॅस्टीक बॉडी मिळाली आहे मात्र कारचे वजन अवघे १२०० किलोच आहे. या कारला एक इलेक्ट्रीक मोटर व २ सिलींडर पेट्रोल इंजिनची ताकद दिली जाणार आहे.

बीएमडब्ल्यू प्रमाणेच फोक्सवॅगन कंपनीही अशीच कार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांची कार १ लिटर इंधनात १११ किमी अंतर पार करणार आहे. एक्स एल वन असे या कारचे नामकरण केले गेले आहे. ही डिझेल पॉवर प्लग इन हायब्रिड कार असून तिला ८०० सीसीचे इंजिन इलेक्ट्रीक मोटरला जोडलेले आहे.

Leave a Comment