
नवी दिल्ली- २१ जूनला जागतिक योग दिन साजरा होणार असून त्याची भारतभर जय्यत तयारी सुरू असतानाच चीनच्या लिनोव्होने योगा लॅपटॉपची सिरिज सादर केली आहे.
लिनोव्होने आणला ३६० अंशाच्या कोनात फिरणारे लॅपटॉप
हे लॅपटॉप ३६० अंशांमध्ये वाकवता येतात त्यामुळेच त्याला योगा सिरिज म्हटले आहे. ३०,००० ते १,१४,०० रुपयांमध्ये हे लॅपटॉप बाजारात उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना नवीन सेवा पुरविण्यावर आमचा भर असतो त्याबरोबरच कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात लिनोव्हो अग्रेसर आहे असे लिनोव्होचे भारतातील संचालक शैलेंद्र कट्याल यांनी म्हटले आहे. ग्राहकांच्या गरजेला प्राधान्य देऊन तयार करण्यात आलेले डिजाईन असे या लॅपटॉपचे कट्याल यांनी वर्णन केले.
