गुहेतील अनोखे आलिशान व्हिला

guha
अमेरिकेच्या मिसुरी राज्यात कधी गेलात तर गुहांतून बांधलेले आलिशान व्हीला पहायला विसरू नका. या राज्यात सँड स्टोनमधील अनेक गुहा आहेत आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या विकत घेता येतात. गुहा पसंत पडली तर खरेदी करून तेथे मनासारखे घर बांधण्याचा येथे ट्रेंड आहे. विशेष म्हणजे घरांना भिंती मुद्दाम बांधाव्या लागत नाहीत कारण गुहेतील खडकच भितींची जागा घेतात. येथे कल्पनाशक्तीलाही चांगले आव्हान मिळते आणि अजीबगरीब घरे अशी निर्माण होतात.

कर्ट आणि डेबोरा स्लीपर या जोडीने असेच १५ हजार चौरस फुटाच्या गुहेत आपला आलिशान व्हीला उभारला आहे. दोन मजली या घराला पार्टीशन लाकडाचे आहे तर खडकांचा वापर भितींसारखा केला आहे. कोणत्याही हवामानाचा ही घरे सामना करू शकतात. उर्जेसाठी सोलर पॅनलचा वापर सोयीचा ठरतो. अशा घरात राहणार्‍यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे सुख मिळते असे स्लीपर जोडीचे म्हणणे आहे. सोलर उर्जेमुळे ही घरे रात्री नुसती उजळून निघत नाहीत तर गुहेतील गूढ प्रकाशाप्रमाणे चमकतातही.

Leave a Comment