जगात सर्वात स्वस्त भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे तिकीट

bullet-train
मुंबई : जगातली सर्वात स्वस्त ट्रेन भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन असणार आहे. कारण २८०० रुपयांचे तिकीट या मार्गासाठी आकारले जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.

अहमदाबाद मार्गावर १० स्टेशन्स असतील, ज्यासाठी ९८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेन ही जगातली सर्वात स्वस्त हाय स्पीड ट्रेन असेल. या मार्गावर चालणाऱ्या अन्य ट्रेन्सच्या एसी-१ च्या तुलनेत बुलेट ट्रेनचे तिकीट फक्त दीडपट जास्त असेल. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स ५३४ किमीचे अंतर ८ तासात पार करतात, तर बुलेट ट्रेन हे अंतर २ तासांत कापेल.

२०२३ मधील एसी-फर्स्ट क्लासच्या तिकीटानुसार बुलेट ट्रेनचं तिकीट निश्चित केलं जाऊ शकतं. २०२३ मध्ये अंदाजे ४० हजार व्यक्ती दररोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील, असा अंदाज बांधला जात आहे.

Leave a Comment