फेसबुकचे नवे ‘लाईट’ अॅप लॉन्च

facebook
मुंबई : अँड्रॉईड युझर्स स्लो मोबाईल नेटवर्कवर न थांबता फेसबुक वापरता यावे यासाठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने नवे अॅप ‘लाईट’ लॉन्च केले आहे.

याबाबतची माहिती फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पोस्टवर दिली आहे. मार्कने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही फेसबुक लाईट नावाचे एक अॅप लॉन्च केले असून या अॅपच्या मदतीने जगभरातील स्लो मोबाईल नेटवर्क आणि अँड्रॉईड फोन युझर्स अॅधिक जलदरित्या फेसबुकचा वापर करु शकतात.

या अॅपची साईज १ एमबी पेक्षा कमी असून आणि ते काही सेकंदांमध्येच डाऊनलोड होते, असेही मार्क झुकरबर्गने सांगितले. कंपनीचा दावा आहे ‘फेसबुक लाईट’ फार फास्ट आहे, जे कमी इंटरनेट स्पीडवरही फेसबुकच्या स्पीडवर परिणाम करणार नाही, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटचा डाटाही कमी खर्च होतो.

Leave a Comment