जगातील पहिला खून सुमारे ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी झाला

murder
लंडन : सुमारे ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी जगातील पहिला खून किंवा हत्या झाली होती, असा दावा स्पेनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. गेल्या २० वर्षांपासून एका अतिप्राचीन कवटीवर स्पेनचे शास्त्रज्ञ संशोधन करीत होते. त्यातून त्यांनी जगातील सर्वांत जुन्या खुनाचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे.

संशोधक लवकरच या शोधाचे निष्कर्ष घोषित करणार आहेत. या अभ्यासातून शास्त्रज्ञांना त्या काळातील अन्त्यविधीच्या प्रथेबाबतही वेगळी माहिती व पुरावे हाती लागले आहेत. पैकी एका कवटीवर तीक्ष्ण घाव दिसतात. उत्तर स्पेनमध्ये दे लोस हुएसोस येथे २० वर्षांपूर्वी पुरातत्ववेत्त्यांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने संशोधन सुरू केले होते. त्यात बिंघमटन विद्यापीठातील मनुष्य वैज्ञानिक रॉल्फ क्कॉम व इतर दोघांचा समावेश आहे.

Leave a Comment