मोदींच्या छायचित्रावरुन गुगलचा माफीनामा

google
नवी दिल्ली – जाइंट सर्च इंजिन गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरुन माफी मागितली असून गुगलच्या सर्चमध्ये ‘भारतातील १० गुन्हेगार’ सर्च केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे दिसतात. या प्रकरणी गुगलने माफी मागितली आहे.

हा प्रकार त्रासदायक आहे, मात्र हे गुगलेच मत नाही, असे गुगलने म्हटले आहे. गुन्हेगारांचे छायाचित्रे सर्च केल्यानंतर मोदींचे येणारे छायाचित्र हे गैरसमजूतीने झाल्याचेही गुगलने स्पष्ट केले आहे.

जर आपण गुगलवर ‘Top 10 Indian criminals’ असे सर्च केले तर पंतप्रधान मोदींच्याबरोबर दाऊद इब्राहीम, हाफिज सईद आणि ओसामा बिन लादेनही दिसतो. विशेष म्हणजे या भागात रविशंकर, ह्रतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा आणि अरविंद केजरीवालही पाहायला मिळतात. सर्च केल्यावर चेहरे काहीप्रमाणात बदलतात मात्र मोदींचा चेहरा हमखास त्यामध्ये दिसतोच. यावर गुगलचे प्रवक्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हाणाले की, गुगलवरील जे काही छायाचित्रे दिसताता ते एका ब्रिटिश दैनिकाच्या चुकीच्या मेटाडाटामुळे दिसतात.

Leave a Comment