महिन्याभरात केदारनाथाचे ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन

kedar
केदारनाथ यात्रा महिन्यापूर्वी सुरू झाल्यापासून ३० दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे केदारनाथ यात्रा समितीकडून सांगितले गेले आहे. गेल्या वर्षात याच काळात केवळ १६ हजार भाविकच आले होते. मात्र यंदा भाविकांची संख्या वाढल्याने येथील व्यावसायिक तसेच यात्रा समितीनेही आनंद व्यक्त केला आहे. भाविकांची वाढती संख्या म्हणजे व्यापार उदीम पूर्वपदावर येण्याचे संकेत असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्तराखंडातील या चारधामांवर दोन वर्षांपूवी ढगफुटीचे संकट कोसळून अतोनात नुकसान झाले होते तसेच मोठ्या संख्येने भाविक मृत्युमुखी पडले होते. त्यापूर्वी सुरवातीच्या महिन्यांतच अडीच ते तीन लाख भाविक दर्शन घेत असत मात्र दुर्घटना घडल्यानंतरच्या वर्षात येथे भाविकांची संख्या कमालीची घटली होती. यंदा पुन्हा एकदा भाविकांची संख्या वाढली आहे. वास्तविक यात्रा प्रशासनालाही एवढ्य संख्येने भाविक येतील अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था युद्धपातळीवर केली जात असल्याचेही सांगितले.

Leave a Comment