
इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील अग्रणी एलजी ने त्यांचा ५५ इंची अल्ट्रा थीन टिव्ही जगासमोर सादर केला आहे. हा टिव्ही वॉलपेपर इतका पातळ आहेच पण वॉलपेपरप्रमाणेच तो भिंतीवर चिकटविता येतो. त्यामुळे या टिव्हीचे नामकरणही वॉलपेपर टिव्ही असेच केले गेले आहे.
एलजीचा फोल्ड होणारा वॉलपेपर टीव्ही
वॉलपेपर टिव्हीची जाडी अवघी १ मिमी आहे आणि मॅग्नेटच्या सहाय्याने भिंतीवर चिकटविता येतो. या टिव्हीसाठी आर्गेनिक एलइडी डिस्प्ले दिला गेला आहे पण हा स्क्रिन इतका पातळ आहे की तो फोल्ड होऊ शकतो. असाच ५५ इंची आर्गेनिक एलईडी डिस्प्लेचा फ्लॅगशीप टिव्ही एलजीने यापूर्वीही बाजारात आणला आहे मात्र त्याची जाडी ३.५ मिमी इतकी आहे.
