लाचखोरी व भ्रष्टाचार आकडेवारीचा नवा अहवाल

bribe
भ्रष्टाचार आणि लाचखोरीची स्थिती याबाबत नॅशनल कौन्सिल ऑफ एम्प्लॉईड इकॉनॉमिक रिसर्च ने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार शहरी भागात प्रत्येक परिवार वर्षाला सरासरी ४४०० रूपये तर ग्रामीण भागातील परिवार सरासरी २९०० रूपये लाच देऊन आपली कामे करून घेतात असे दिसून आले आहे. यात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी मनरेगा विरूद्ध आल्या असल्याचेही दिसून आले आहे.

पुणे,लखनौ, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, हैद्राबाद या शहरांशिवाय ग्रामीण भागात सरकारी कामे करून घेण्यासाठी, प्रवेश, पोलिस संबंधी कामे यासाठी सर्वाधिक लाच दिली जात असल्याचे यात नमूद केले गेले आहे तसेच शहरी भागात नोकर्‍या, बदल्या यासाठी कुटुंबे वर्षाला १८ हजार तर वाहतूक पोलिसांना वर्षाला ६०० रूपये लाच म्हणून देतांत असेही दिसून आले आहे.

ग्रामीण भागात सर्वाधिक लाच मनरेगा, अन्न सुरक्षा, रेशन, इंदिरा आवास योजना, शिष्यवृत्ती यासारखी सरकारी कामे करून घेण्यासाठी दिली जाते असे दिसून आले. हे सर्वेक्षण उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, तमीळनाडू, आंध्र, महाराष्ट्र राज्यातील ३५९ कुटुंबात केले गेले आणि त्याचा अहवाल २०१३-१४ सालीच दिला गेला असे समजते. मात्र ही आकडेवारी आत्ता जाहीर केली गेली आहे.

Leave a Comment