
तैवानी कंपनी आसूसने जगातील सर्वाधिक सडपातळ लॅपटॉप जेनबुक यू एक्स ३०५ सादर केला असून १३.३ इंची स्क्रीनचा हा लॅपटॉप अल्ट्रापोर्टेबल आहे. सध्या या लॅपटॉपची किंमत ४९९९९ रूपये ठेवली गेली आहे. तो फ्लिपकार्टवर ऑनलाईन आणि आसूस एक्सल्क्यूसिव्ह स्टोअर्समध्ये ऑफ लाईन खरेदीसाठी १५ मे पासून उपलब्ध आहे. या लॅपटॉपची जाडी आहे १२.३ एमएम.
आसूसचा सडपातळ जेनबुक यूएक्स ३०५ लाँच
साधारणपणे १.२ किलो वजनाचा हा लॅपटॉप दोन रंगात सादर केला गेला आहे. ८ जीबी रॅम, हार्ड डिस्कच्या जागी ५१२ जीबी ची सॉलीड स्टेट डिस्क, १० तास बॅटरी लाईफ, अॅडव्हान्स थर्मल मॅनेजमेंट डिझाईनमुळे कुलींग फॅन्सची गरज नसलेला, फुल साईज अगॅनॉमिक की बोर्ड अशी याची अन्य फिचर्स आहेत. या कीबोर्डमुळे सहजतेने आणि अचूक टायपिंग शक्य होते असा कंपनीचा दावा आहे. या लॅपटॉपला ३.० सुपर स्पीड यूएसबी पोर्टस दिली गेली आहेत पैकी एक मोबाईल डिव्हायसेस वेगाने चार्ज करण्यासाठी सपोर्ट करते असेही सांगितले जात आहे.
