ब्यूटी ट्रीटमेंटचे असेही वर्ल्ड रेकॉर्ड

massagetreat
चीनच्या शेंगडोंग प्रांतातील जिनान शहरात ब्युटी ट्रीटमेंटचे जागतिक रेकॉर्ड नुकतेच बनविले गेले असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये करण्यात आली आहे. गतवेळचे हे जागतिक रेकॉर्ड भारताच्या नावावर होते आणि ते मुंबईत रचले गेले होते.

जिनानमधील एका फुटबॉल स्टेडियममध्ये एकाच वेळी १ हजार महिलांना ब्युटी ट्रीटमेंट देण्यात आली. मैदानात मांडलेल्या १ हजार कॉटवर एकाचवेळी १ हजार महिलांना अर्धा तास मसाज करण्यात आला. एकाचवेळी, एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येन महिलांना ब्यूटी ट्रीटमेंट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली.

२०१४ साली मुंबईत एकाचवेळी २८७ लोकांना फेशियल मसाज देऊन रेकॉर्ड नोंदविले गेले होते. ते रेकॉर्ड चीनने मोडले आहे. यावेळी महिलांना फेशियल मसाज, क्लिनसिंग, मास्क, मॉइश्चरायझिग मसाज असे विविध मसाज केले गेले.

Leave a Comment