
मेनलो पार्क – आता फेसबुकवर वृत्तपत्रात आलेले सर्व लेख आणि बातम्या वाचता येणार आहेत. ज्या वृत्तपत्रातील बातम्या वाचायच्या आहेत त्यासाठी एक विंडो देण्यात येणार आहे.
आता फेसबुकवर वाचता येणार संपूर्ण बातमी
त्यावर आपण पूर्ण बातमी वाचू शकणार आहोत. या विंडोवर ज्या जाहिराती असतील त्याचा महसूल वृत्तपत्राच्या समूहाला मिळेल. यातून फेसबुकला काही महसूल मिळणार नसला तरी फेसबुक युजर्स जास्तीत जास्त वेबसाइटला खिळून राहतील असे तंत्रज्ञान काहीच दिवसात विकसित केले जाणार असल्याचे वाल स्ट्रीट जर्नलनी सांगितले आहे. न्यूयॉर्क टाइम्स, बजफीड आणि नॅशनल जिओग्राफिक यांनी फेसबुकच्या या नवीन योजनेत सहभागी व्हायचे ठरवले आहे. फक्त फेसबुकच नव्हे तर स्नॅपचॅट आणि ट्विटरही त्यांच्या साइटवर बातम्या ठेवणार आहेत.
