नव्या रुपात टाटा नॅनो

tata-nano
पुणे : आता नव्या रुपात रतन टाटा यांची महत्त्वाकांक्षी कार ‘नॅनो’ बाजारात येणार आहे. टाटा कंपनी ‘जेनएक्स नॅनो’ हे मॉडेल बाजारात उतरवण्याची तयारी करत आहे. सर्वात स्वस्त कार हा टॅगही टाटा मोटर्सच्या या कारवरुन हटवला जाणार आहे.

कंपनी पहिलीच कार खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्वात स्वस्त कारचा टॅग हटवण्यासाठी नव्या मॉडेलमध्ये अनेक फीचर्सची भर करणार आहे. २००९मध्ये नॅनोला सर्वात स्वस्त कार म्हणून लॉन्च करण्यात आले होते. सामान्यांचे स्वत:ची कार घेण्याचे स्वप्न नॅनोमुळे पूर्ण झाले होते.

‘जेनएक्स नॅनो’मध्ये ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन, ओपनेबल बूट तसेच ब्लूटूथ फोन सिंक ऑडिओ प्रणाली शिवाय इतरही काही फीचर्सचा समावेश असतील. ‘जेनएक्स नॅनो’ येत्या सहा ते सात आठवड्यांमध्ये बाजारात येईल. यानंतर नॅनो सीरिजमधील सध्या उपलब्ध असलेले व्हर्जन बाजारातून हळूहळू हटवले जातील.

Leave a Comment