
मुंबई : भारतात ब्रिटिश स्मार्टफोन कंपनी फ्लायने स्मार्टफोन लॉन्च केला असून हा स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन मार्केटिंग वेबसाईट स्नॅपडीलवरच उपलब्ध आहे. फ्लायच्या या स्मार्टफोनचे नाव स्नॅप असे आहे. हा स्मार्टफोन भारतात फक्त २ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
फ्लायचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च
या स्मार्टफोनचा डिस्प्ले ४ इंचाचा असून त्याचे रिझॉल्युशन ४८० x ८०० एवढे आहे. त्याचबरोबर यामध्ये १.३ GHz क्वॉड-कोर प्रोसेसरसोबत ५१२ एमबी रॅम आहेत. या फोनचा रेअर कॅमेरा ५ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेलचा असल्यामुळे आपण उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी करू शकता. या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ५ जीबी (१६ जीबीपर्यंत एक्स्पांडेबल) आहे, तर ऑपरेटिंग सिस्टिम ४.४ किटकॅट असून त्यामुळे ज्यांना कमी बजेटमध्ये मोबाईल घेयाचं आहे, त्यांच्यासाठी फ्लाय स्नॅप हा उत्तम पर्याय आहे.
