आता फेसबुक मॅसेंजरद्वारे व्हिडीओ कॉलिंगही शक्य !

facebook
वॉशिंग्टन – फेसबुकने वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता आपल्या मॅसेंजर अॅपला अधिक अद्यावत केले असून आता फेसबुक युजर्सना मॅसेंजर अॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंगही करणेही शक्य झाले आहे. याबाबत फेसबुकचे कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे ही सोय अगदी विनामुल्य उपलब्ध आहे. फेसबुकने याविषयी घोषणा केली. जगभरात फेसबुक मॅसेंजर अॅपचे ६०० मिलियन युजर्स आहेत. फेसबुकने ही सुविधा उपलब्ध करण्यापुर्वी स्काइप, फेसटाईम आणि हँगआऊट या अॅपवर ही सुविधा उपलब्ध केली होती. ही सुविधा कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्ससह काही देशांत सुरु झाली आहे. लवकरच ती भारतातही सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment