रुळावरून घसरली माथेरानची मिनी ट्रेन

matheran
कल्याण : रविवारी दुपारच्या सुमारास नेरळ ते माथेरानदरम्यान चालवली जाणारी मिनी ट्रेनला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जुम्मा पट्टी स्टेशनवर माथेरानच्या दिशेने जाणारी मिनी ट्रेन उभी असताना अचानक रुळावरुन घसरली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेचे ठिकाण म्हणून नागरिकांची आवड बनलेले माथेरान मुंबईपासून १०० ते १५० किलोमीटर असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या परिसरातील कुटुंब सहलीसाठी येत असतात. त्यावेळी या मिनी ट्रेनने प्रवास करण्याची हौस असल्याने मिनी ट्रेनला उन्हाळी सिझनला मोठी गर्दी असते. ही मिनी ट्रेन धीम्या गतीने असल्याने या ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. याआधी जानेवारीमध्ये मिनी ट्रेन रुळावरुन घसरल्याची घटना घडली होती.

Leave a Comment