सिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध – नड्डा

nadda
नवी दिल्ली : सिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध असल्यामुळे केंद्र सरकार तंबाखू सेवनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी कटिबद्ध असून, तंबाखू उत्पादनांच्या पाकिटावरील धोक्याचा इशारा देणा-या छायाचित्रांचा आकार मोठा करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. तंबाखूमुळे कॅन्सरचा धोका असून, तंबाखू सेवन, सिगारेट ओढण्याचा थेट संबंध कॅन्सरशीच आहे. त्यामुळे वाढते धोके टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन कसे कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे नड्डा म्हणाले. यावेळी त्यांनी २००६ च्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एका अहवालाचा दाखला देत सांगितले की, तंबाखूच्या सेवनाने किंवा धुम्रपानामुळे हृदयविकारासह हृदयाचे आाजार आणि कॅन्सरचा धोका उद्भवतो. त्यामुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण कसे कमी करता येईल, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याबरोबरच धोक्याचा इशारा देणारे मोठ्या आकाराचे छायाचित्रेही पॉकेटवर प्रकाशित केले जातील, असेही नड्डा म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment