ऑडीची टीटी कूपे लाँच

audi
जर्मन लग्झरी कारमेकर कंपनी ऑडीने त्यांची टीटी कूपे ही लग्झरी कार भारताच्या मार्केटमध्ये आणली असून या गाडीची दिल्लीतील किंमत ६० लाख ३४ हजार रूपये आहे. भारतातील लग्झरी कार मार्केटमध्ये टॉपवर राहण्याचा कंपनीचा प्रयत्न असून येत्या कांही महिन्यात आणखी पाच मॉडेल्स कंपनी बाजारात आणणार आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख जो किग या संदर्भात बोलताना म्हणाले की, येत्या कांही महिन्यात आम्ही आणखी पाच मॉडेल्स आणत असून टीटी कूपे यापासून त्याची सुरवात केली आहे. गतवर्षी आर्थिक मंदीच्या वातावरणातही आम्ही आमच्या विक्रीत वाढ नोंदविली आहे. या वर्षभरात एकूण १० मॉडेल्स आम्ही बाजारात सादर करत आहोत. मर्सिडीज बेंझबरोबर ऑडीची टक्कर असून जानेवारी ते मार्च या काळात कार विक्रीत ऑडीने मर्सिडीजला मागे टाकले असल्याचेही त्यांनी सांगितले. मार्च अखेर कंपनीने ३१३९ कार विकल्या असून विक्रीत १५ टक्के वाढ नोंदविली आहे.

Leave a Comment