आयबेरीचा ऑक्सस बीस्ट आला

beast
आयबेरीने त्यांचा ऑक्सस बीस्ट हा मिडरेंज स्मार्टफोन २० एप्रिलपासून स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध केला असून त्याची किंमत आहे १३९९० रूपये. या किमतीत ग्राहकाला ३ हजार रू. किमतीच्या वायकॅम कंट्रोल, स्क्रीन गार्ड, सिलीकॉन केस यासारख्या अॅक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहेत.

ड्युअल सिमचा हा स्मार्टफोन अॅड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस सह आहे. याला ५.५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा,१३ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, दमदार बॅटरी अशी अन्य फिचर्स दिली गेली आहेत. थ्रीजी, जीपीआर एस/एज, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसपी कनेक्शन ऑप्शनची सुविधा आहे आणि सध्या हा फोन फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहे. मात्र युजर बॅक पॅनलसाठी लाल, निळा, पांढरा अश्या रंगाचे कव्हर वापरू शकणार आहे.