४००० फूट उंचीवरील बोगद्याला चीनमध्ये म्हणतात ‘स्वर्गाचे प्रवेशद्वार’

havean-gate
तिआनमेनन – चीनच्या तिआनमेनन डोंगरावर ४१९६ हजार फूट उंचीवर निसर्गतः बोगदा बनला असून या बोगद्याला ‘स्वर्गाचे प्रवेशद्वार’ असे म्हटले आहे. ट्रिप ऍडव्हायझरने ‘स्वर्गाचे प्रवेशद्वार’ ला पाच पैकी साडेचार स्टार दिले आहेत.

या बोगद्यामुळे पर्यटकांना याचे आकर्षण वाटते. हुनान राज्यातील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यास अनेक वळणे असलेल्या रस्त्यावरून जावे लागते. या बोगद्यापर्यंत जाण्यासाठी ९९९ पायर्‍या चढाव्या लागतात. याठिकाणी जाण्यासाठी केबल कार नेटवर्क आहे. परंतु बहुतांश लोक पायर्‍यांनीच जाणे पसंत करतात. आयुष्यात एकदा तरी या पर्यटन स्थळाला भेट द्यावी असे म्हटले जाते.

Leave a Comment