केसांच्या सहाय्याने करा स्मार्टफोन कंट्रोल

hairware
ब्राझीलमधील संशोधकांनी केसांच्या सहाय्याने स्मार्टफोन कंट्रोल करण्याचे नवे तंत्रज्ञान वापरात आणले आहे. हेअरवेअर असे या तंत्रज्ञानाचे नामकरण केले गेले असून त्याचा शोध पॉलिफिकल कॅथॉलिक विद्यापीठातील कातिया वेगा या संशोधकाने लावला आहे. हे तंज्ञज्ञान आपत्तीजनक परिस्थितीत सापडलेल्या महिलांसाठी फारच उपयुक्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या तंत्रज्ञानानुसार केसात फोन ऑपरेट करण्याचा स्वीच सहजी लपविला जाणार आहे. हेअरपीन, हेअरबँड अथवा अगदी निरूपद्रवी वाटतील अशा कोणत्याही हेअरवेअरचा त्यासाठी उपयोग होऊ शकतो. समजा तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा आहे अथवा आपले लोकेशन कळवायचे आहे तर तुम्ही सहज केसांवरून नुसता हात फिरविला तरी तुमचे काम होणार आहे. हा स्वीच स्मार्टफोन अॅक्टीव्हेट करून योग्य ती कामगिरी पार पाडणार आहे. यात मायक्रो कंट्रोलर व ब्ल्यू टूथ रेडिओही आहे. केसांची इलेक्ट्रीक चार्ज स्टोअर करण्याची क्षमता लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे.

संशोधकांच्या मते महिलांसाठी हे फारच उपयुक्त आहे. समजा त्यांच्यावर कोणताही आणीबाणीचा प्रसंग आला तर त्या सहजरित्या फोनला स्पर्शही न करता मेसेज अथवा आपले लोकेशन या हेअरवेअरच्या सहाय्याने संबंधित ठिकाणी कळवू शकणार आहेत. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान दाढीच्या केसांसाठीही उपयुक्त ठरेल असा संशोधकांना विश्वास वाटतो आहे आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment