पाण्यावर दौडणारी पँथर जीप

panthrr
जमीन आणि पाण्यावरही सारख्याच क्षमतेने धावणारी कार आपण कदाचित पाहिली नसेल. वॉटरकार कंपनीने अशी जीप नुकतीच बाजारात आणली असून कंपनीने वेबसाईटवर त्यासंदर्भातली सर्व माहिती दिली आहे. त्यानुसार जगातील सर्वात वेगवान अँफीबियन ( जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी ) वाहन तयार करण्याचा त्यांनी १९९९ सालीच निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात १४ वर्षांचे सततचे प्रयत्न व अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी पहिली वॉटरकार २०१० साली तयार केली आणि तिने गिनिज बुक मध्ये आपले नांवही कोरले.

या नंतर आता ही कंपनी या प्रकारची जीप बाजारात आणत असून तिचे नांव पँथर असे ठेवले गेले आहे. कंपनीने २७ प्रकारची पेटंट घेऊन ही जीप तयार केली आहे. ही जीप १०१३ साली सर्व त्या आवश्यक सुधारणा केल्यानंतर विक्रसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार जणांची बसण्याची व्यवस्था असलेल्या या जीपचे वजन आहे १३३८ किलो. ती पाण्यात ताशी ७० किमीच्या वेगाने जाते तर जमीनीवर तिचा वेग ताशी ९० किमी पर्यंत आहे. कंपनीने जीपसाठी होंडा इंजिन बसविले आहे आणि ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार (कस्टमाईज्ड) ती हव्या त्या स्वरूपात बनवून दिली जाणार आहे. या जीपची किंमत आहे ९५ लाख रूपये.

Leave a Comment