अमेरिकेतील कोर्टाचा निर्वाळा ; ‘योगा’ आहे धर्मनिरपेक्ष!

yoga
वॉशिंग्टन – अमेरिकेतील कोर्टाने ‘योगा’ हे धर्मनिरपेक्ष असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये योगाभ्यास केल्याने कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत नाही, असे स्पष्ट करत येथील शाळांमध्ये योगाभ्यास सुरु ठेवण्याची परवानगी कॅलिफोर्निया कोर्टाने दिली आहे.

सॅन डिएगोतील एन्सिनिट्स युनियन एलेमेंटरी स्कुलमध्ये सुरु असलेल्या योगाभ्यासाला येथील सत्र न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यावर कॅलिफोर्नियाच्या चौथ्या कोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगा शिकविण्याच्या निर्णयावर शाळेविरुद्ध पालकांनी कोर्टात धाव घेतली होती. तसेच योगाभ्यास हा घटनाविरोधी असल्याचा दावा त्यांनी केला. शाळेच्या या निर्णयावर आम्ही नाराज असून आम्ही पर्यायावर काळजीपूर्वक विचार करत आहोत, असे पालकांकडून बाजू मांडताना वकील डिन ब्रोईल्स यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले आहे. अमेरिकेत गेल्या ५० वर्षात अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षणाला परवानगी देण्याचा प्रयत्न कोणत्याही कोर्टाने केला नाही. असेही ब्रोईल्स यांनी म्हटले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment