
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश पद्धती बदलून नवी पद्धत बनविण्याचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत नाहक त्रास होत असल्याप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आदेश दिले आहेत.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया बदला
अनेक दोष अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश पद्धतीत आढळून आले होते. वैशाली बाफना यांनी प्रवेश प्रक्रियेच्या किचकटपणाबद्दल एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या प्रवेशासाठी नवीन पद्धत आखली जाईल.
त्याचबरोबर न्यायालयाने अकरावी प्रवेशाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिल्यामुळे यावर्षी तरी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.
