अखेर व्हॉट्स अॅपचे व्हॉईस कॉलिंग सुरू!

whatsapp
मुंबई: आजपासून सगळ्या युजर्ससाठी व्हॉट्स अॅपने अखेर आपले बहुप्रतीक्षित व्हॉइस कॉल हे फीचर सुरु केले असून तुम्हाला हे नवे फिचर व्हॉटस अॅपचे अपडेट केल्यास पाहता येणार आहे. सुरुवातील व्हॉटस अॅपने आपले हे फीचर मर्यादित स्वरुपात ठेवले होते. मात्र आजपासून सर्वच युजर्सना व्हॉइस कॉल फीचर वापरता येणार आहे.

व्हॉटसअॅप कॉलिंग फीचर हे फक्त आतापर्यंत मर्यादित स्वरुपात होते. या फिचरची गेल्या अनेक दिवसापासून चाचणी सुरु होती. गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरविषयी चर्चा सुरु होती. मात्र, सुरवातील यात अनेक अडचणी आल्या. अखेर आजपासून हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment