शिओमीचा फेरारी स्मार्टफोन ३१ मार्चला लाँच

ferrari
चीनी शिओमीने त्यांच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त चीनमध्येच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मिड रेंज फेरारी हा नवा स्मार्टफोन लाँच करण्यात येत असल्याचे संकेत दिले आहेत. याचवेळी अॅपलच्या स्मार्टवॉचशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी स्मार्टवॉचही लाँच करणार असल्याची बातमी आहे. हा कार्यक्रम वर्धापनदिनी म्हणजे ३१ मार्चलाच होत आहे.

कंपनीच्या फेरारी बद्दल बरेच दिवस चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मिडरेंज स्मार्टफोनसाठी ४.९ इंचाचा फुल एचडी स्क्रीन, २ जीबी रॅम, अॅड्राईड लॉलीपॉप ५.०.२ ओएस, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, १६ जीबी इंटरनल मेमरी अशी फिचर्स दिली गेली आहेत. फोनची किमत असून जाहीर करण्यात आलेली नाही. हा फोन म्हणजे रेडिमी नोटची पुढची आवृत्ती असल्याचेही सांगितले जात आहे.

1 thought on “शिओमीचा फेरारी स्मार्टफोन ३१ मार्चला लाँच”

Leave a Comment