२,९९९ रुपयात एक वर्ष फ्री इंटरनेटवाला स्मार्टफोन

datawind
मुंबई : तुम्हाला आता तुमच्या दोन ते तीन हजाराच्या बजेटमध्ये स्मार्टफोन मिळणार असून या स्मार्टफोनसह तुम्हाला चक्क एक वर्ष फ्री इंटरनेट सुविधाही मोफत मिळणार आहे.

‘डाटाविंड’ कंपनीने स्मार्टफोन प्रेमींसाठी २ जी आणि ३ जी मोबाईल हँडसेट लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनसह एक वर्ष फ्री इंटरनेट सुविधाही असणार आहे. ‘डाटाविंड’ने लॉन्च केलेल्या या लो-बजेट स्मार्टफोन्सची किंमत १,९९९ ते ५,४९९ रुपयांच्या दरम्यान असणार आहे. शिवाय वेगवेगळे फीचर्सही
असणार आहेत. ‘आरकॉम’सोबत करार करुन ‘डाटाविंड’ने मोबाईलमध्ये एक वर्षासाठी फ्री इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली आहे.

पॉकेटसर्फर २ जी-४ ची वैशिष्ट्ये – ‘पॉकेटसर्फर २जी ४’ हा फोन ३.५ इंचचा असून यामध्ये ड्युअल सिम कार्ड आणि एज नेटवर्क कम्पॅटिबलिटीची सुविधा देण्यात आली आहे. या फोनची किंमत १ हजार ९९९ रुपये एवढी आहे. यामध्ये एफएम, ब्लूटूथ आणि वायफायचीही सुविधा आहे.

पॉकेटसर्फर ३ जी-४ ची वैशिष्ट्ये – ‘पॉकेटसर्फर ३जी४ ‘ हा फोन ४ इंचाचा असून यामध्ये ड्युअल सिमसोबतच ड्युअल कॅमेरा आणि ३ जी सपोर्टची सुविधा देण्यात आली आहे. या हँडसेटची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. या हँडसेटमध्ये एक वर्षापर्यंत ३ जी वेब ब्राऊजिंग फ्री आहे. यामध्ये ४.४ अँड्रोईड किटकॅटसोबत ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Leave a Comment