फेसबुक मेसेंजरवरुनही आता पाठवा पैसे

facebook
न्यूयॉर्क : सोशल नेटवर्क साईट फेसबुक ही लवकरच आपल्या मेसेंजरमध्ये अॅपमध्ये अपडेट करणार असून एक नवे फीचर फेसबुक मेसेंजरमध्ये अॅड केले जाणार असल्यामुळे फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातूनही तुम्ही पैसे ट्रान्सफर करु शकता.

फेसबुकच्या ब्लॉग पोस्टवरील माहितीनुसार, फेसबुक मेसेंजरमधून पैसे ट्रान्स्फर करण्याचे हे नवे फीचर सध्या अमेरिकेतील फेसबुक युजर्सनाच उपलब्ध केले जाणार आहे. या फीचरचा लाभ घेण्यासाठी युजर्सला डेबिट कार्डची नोंद करावी लागणार आहे. डेबिट कार्डची माहिती पूर्णपणे सुरक्षित असेल, याकडे विशेल लक्ष दिले जाणार आहे.

डेबिट कार्ड रजिस्ट्रर केल्यानंतर फेसबुक युजर आपल्या फ्रेण्डशी चॅटिंग करत असताना तिथे उपलब्ध असणारा बटन दाबून किती पैसे पाठवायचे आहेत ते टाइप करावे लागेल. त्यानंतर पेसे ट्रान्सफर करण्याचे बटन दाबून पैसे पाठवू शकता.

फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची हे फीचर फेसबुकच्या सोशल नेटवर्कवरील घडामोडींपासून दूर ठेवले जाणार आहे. पूर्णपणे सुरक्षितता राखण्यासाठी आणि कोणतेही अफरातफर होऊ नये यासाठी अधिक लक्ष दिले जाणार आहे.

Leave a Comment