स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी केंद्राला साकडे

deepak-sawant
मुंबई – आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दीपक सावंत यांनी राज्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागितली असून केंद्र शासनाने तात्काळ ७८ कोटी २४ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी दीपक सावंत यांनी केली आहे.

राज्यात स्वाईन फ्लूचा धोखा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचबरोबर परराज्यातूनही रुग्ण उपचारसाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र कक्ष, वेंटिलेटर, औषधी त्याच बरोबर गोळ्या आणि लस उप्लब्धतेसाठी केंद्राने ७८ कोटी २४ लाख रूपये उपलब्ध करून द्यावेत असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment