इस्लामिक स्टेटचे खलिफा बुक लाँच

isis
फेसबुक आणि ट्विटर या लोकप्रिय सोशल नेटवर्क साईटवरून इस्लामिक स्टेटच्या समर्थकांची अकौंट बंद करण्यात आल्याने इस्लामिक स्टेटने स्वतःचे सोशल नेटवर्क सुरू केले असल्याचे समजते. खलिफा बुक या नावाने हे नेटवर्क सुरू झाले असून ते ऑफलाईनही चालू शकते. या नेटवर्कच्या मुख्य पेजवर इस्लामिक स्टेटची चिन्हासह ओळख आणि जगाच्या नकाशावर त्यांचे स्थान डॉटच्या सहाय्याने दर्शविले गेले आहे.

हे नेटवर्क सुरू करण्यामागे इस्लामिक स्टेटचा आपल्या समर्थकांशी जोडले राहणे आणि नवीन ऑनलाईन भर्तीसाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment