
पुणे – ७ मे रोजी येत्या शैक्षणिक वर्षात होणारी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच एमएच-सीईटी ही होणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. २४ मार्चपर्यंत असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाकडून कळविण्यात आले आहे.
७ मे रोजी सीईटी प्रवेश परीक्षा
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करिता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अॅन्ड ओ, बीएस्सी नर्सिंग आणि बीव्हीएससी अॅन्ड एच या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एमएच-सीईटी घेतली जाते. ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या ७ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ५ मार्चपासून ऑनलाईन अर्ज वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रवेश परीक्षासंबंधातील पात्रतेचे नियम व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
