भारतीय आयबॉल कंपनी टॅबलेट विक्रीत अग्रेसर

iball
नवी दिल्ली- भारतीय आयबॉल या कंपनीने सॅमसंग या बलाढ्य कंपनीला मागे टाकत ऑक्टोबर – डिसेंबरसाठी टॅबलेट विक्रीची विक्रमी वाढ नोंदवली असल्याचे इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशनने आज सांगितले आहे. बाजारात एकूण टॅबलेटच्या होणाऱ्या विक्रीपैकी उत्पन्नापैकी आयबॉलचा वाटा १५.६ टक्के आहे, सॅमसंगचा वाटा १२.९ टक्के आहे, डाटाविंडचा वाटा ९.६ टक्के आहे, लेनोव्हो ९.४ टक्के तर एच. पीचा वाटा ८.७ टक्के आहे. मागील वर्षी ही विक्री ४.५ टक्के होती.

Leave a Comment