आता गप्पा मारणार बार्बी डॉल

barbi
जगभरातील मुलींची आवडती बार्बी डॉल त्यांच्या मागणीप्रमाणे आता त्यांच्याशी गप्पागोष्टी करणार आहे. गेली कित्येक वर्षे या मुली बार्बीने त्यांच्याशी बोलावे अशी मागणी डॉल उत्पादकांकडे करत होत्या ती उत्पादकांनी पूर्ण केली आहे. नवीन स्मार्ट बार्बी आता बोलेल, गोष्टी सांगेल, विनोद सांगेल आणि तिच्याशी खेळणार्‍या मुलामुलींचे बोलणे ऐकूही शकेल.

बार्बीचे उत्पादक मटेल यांनी यासाठी अमेरिकन स्टार्टअप टॉय टॉक यांच्याबरोबर करार केला आहे. त्यानी ही बोलणारी बार्बी विकसित केली असून टॉय टॉकने विकसित केलेल्या स्पीच रेकग्निशन प्लॅटर्फार्मवर ती तयार केली गेली आहे. ही बार्बी गेम्स खेळेल, बोलणे ऐकेल, ते लक्षात ठेवेल आणि त्यानुसार गप्पा मारेल. पूर्ण चार्ज केल्यानंतर ती पूर्ण दिवस चालेल. तिच्या गळ्यात असलेल्या नेकलेसमध्ये मायक्रोफोन, स्पीकर, २ एलईडी आणि पायात रिचार्जेबल बॅटरी बसविली गेली आहे. या स्मार्टबॉबीसाठी वायफाय कनेक्शन गरजेचे आहे आणि तिची किंमत आहे ४७०० रूपये.

Leave a Comment