
जगातील सर्वात सडपातळ स्मार्टफोन बनविणार्या आपोने त्यांचा आर ८ स्मार्टफोनची लिमिटेड एडिशन लाँच केली असल्याचे वृत्त आहे. या एडिशनमध्ये फक्त १० हजार फोन विक्री केले जाणार असून प्री बुकींग केल्याशिवाय तो ग्राहकांना विकत घेता येणार नाही. आप्पोचे सर्वात सडपातळ स्मार्टफोनचे रेकॉर्ड नुकतेच मोडले गेले आहे मात्र भारतात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये आजही आर ८ च सर्वात सडपातळ स्मार्टफोन आहे. याची जाडी आहे अवघी ४.८५ मिमी.
ओप्पोचा आर ८ लिमीटेड एडिशन फोन
लिमिटेड एडिशनसाठी खास गोल्ड फ्रेम दिली गेली आहे. या एडिशनमधील १० हजार फोनपैकी भारतात किती विकले जाणार आहेत हे अद्यापी स्पष्ट करण्यात आलेले नाही. या फोनची किंमत आहे २९९९० रूपये. अन्य फिचर्समध्ये ५.२ इंची फुल एचडी अमोलेड डिस्प्ले, २ जीबी रॅम, १३ एमपी मेन शूटर कॅमेरा, सेल्फी आणि व्हीडीओ कॉलींग साठी ५ एमपी कॅमेरा, अँड्राईड किटकॅट ४.४.४, फोन जादा गरम होऊ नये म्हणून कूल इलिमेंट नावाचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. हा फोन हँडपॉलीशने अधिक चमकदार दिसतो तसेच ३० मिनिटात ७५ टक्के चार्ज होतो.
