आता फोन करा व्हॉट्सअ‍ॅपवरून

whatsapp
नवी दिल्ली : आता लवकरच लोकप्रिय व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग सेवेवर फोन करण्याची सुविधा सुरू झाली आहे. मात्र, या सुविधेचा लाभ केवळ अ‍ॅँड्रोईड मोबाईलधारकांनाच घेता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणात होत असून अशा वापरकर्त्यांची लाट निर्माण झाली आहे. जगात साधारणपणे सुमारे ६०० दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅपचे वापरकर्ते असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉईस कॉलिंगची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नवीन सुविधेचा वापर करण्यासाठी अ‍ॅँड्रोईड वापरकत्र्यांना आपल्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करून घ्यावी लागणार आहे. तसेच ही सुविधा वापरणा-या व्यक्तीकडूनच निमंत्रण मिळाल्यानंतरच नवीन व्यक्तीला ही सेवा वापरता येऊ शकेल. त्या व्यक्तीने फोन केल्यानंतरच तुमचे हे फिचर अ‍ॅक्टिव्हेट होईल. व्हॉट्सअ‍ॅपचे जगात ६०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्यामुळे या सुविधेमुळे दूरसंचार क्षेत्रात आणि त्यांच्या वेगवेगळ्या फिचर्समध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आता दूरसंपर्क ग्राहकांना केवळ डेटा विकत घेण्याचे पैसे भरावे लागतील. ही सुविधा वापरल्यास ग्राहकांना नेहमीचे कॉल चार्जेस लागणार नाही.

ही सुविधा अ‍ॅँड्रोईडच्या किटकॅट व्हर्जनवर उपलब्ध आहे. ही फोन सुविधा हवी असल्यास ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपचे २.११.५३१ ही आवृत्ती वापरावी लागेल. ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या वेबसाईटवरून थेट मिळू शकेल. व्हॉट्सअ‍ॅपने सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याआधी देखील व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर एक नेक्सस ५ यूजरच्या अ‍ॅपमध्ये पुढे आले होते. त्यावेळी वृत्त होते की, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या व्हाईस कॉलिंग फीचरची टेस्टिंग करीत आहे. मात्र आता आपण आपल्या मित्रांशी एका कॉलसोबत व्हॉट्सअ‍ॅप व्हाईस कॉलिंग क्लबशी जोडू शकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या एका कॉलनंतर मोबाईलधारकांच्या अ‍ॅपमध्ये व्हाईस कॉलिंग फीचरचे अपडेट होत आहे. हे फीचर आता सर्व मोबाईलधारकांसाठी अ‍ॅक्टिव्हेट होणार नाही. शक्यता आहे की, व्हॉट्सअ‍ॅपने कदाचित व्हाईस कॉलिंगसाठी मोबाईलधारकांची एयर मर्यादा निश्चित केली असावी. हे फीचर सध्या आयफोनमध्ये इंट्रोड्यूस केलेले नाही. तर व्हॉट्सअ‍ॅपचे आयओएससाठी मागील महिन्यात व्हर्जन लॉन्च केलेले आहे.त्याच्या चॅट विंडोमध्ये कॉलिंग ऑप्शन आहे, पण ते आता उपलब्ध नाही. तसेच हे फीचर सध्या विंडोज यूजर्ससाठी देखील उपलब्ध नाही.

1 thought on “आता फोन करा व्हॉट्सअ‍ॅपवरून”

Leave a Comment