आता दहा मिनिटेआधीच मिळणार दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका

board
पुणे – प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली आहे.

परीक्षा दालनात नियोजित वेळेपेक्षा तीस मिनिटे अगोदर इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशारा घंटा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रश्नपत्रिकेचे वाटप करण्यात येईल.

Leave a Comment