लिनोवोचा १६ तास टॉक टाइमवाला ४जी स्मार्टफोन

lenova
मुंबई: शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टफोनन पी७० चीनची कंपनी लिनोवोने लॉन्च केला आहे. पी सीरिज अंतर्गत हा फोन लॉन्च केला असून याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे.

१.५ जीएचझेड ऑक्टा कोर मीडिया टेक प्रोसेसर युक्त हा स्मार्टफोन असून ‘४जी’ला हा स्मार्टफोन सपोर्ट करतो. रॅम २ जीबी आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याची बॅटरी 4,000 एमएएचची आहे. हा २जी वर १६ तासांचा टॉक टाइम देईल असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला गेला असून भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फोनची किमत १३३९ युआन म्हणजे भारतीय चलनानुसार १३,९८० रुपये असणार आहे.

Leave a Comment