स्वाईन फ्लूचे मुख्यमंत्र्यांच्या गावातच २२ बळी

swine-flu
नागपूर- उपराजधानी नागपूरचे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या गावात गेल्या महिनाभरात स्वाईन फ्लू आजाराने २२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ९४ जणांच्या करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात १८६ जणांना आतापर्यंत या आजाराची लागण झाली असून यापैकी ३८ जण मृत्यू झाला आहे. मात्र या ३८ जणांमध्ये २२ जण एकटया नागपूरचे आहेत. वातावरणातील बदलामुळे होणा-या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचा दावा राज्याचे आरोग्य खाते करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र यावर आळा बसण्यापेक्षा यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घशाचे नमुने तपासणीसाठी जाणा-या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मेडिकल-मेयो या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लोकांची गर्दी आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment