
नवी दिल्ली – स्पाइसजेट एअरलाइन्सने आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एक आकर्षक योजना आणली असून रेल्वेपेक्षाही स्वस्त प्रवास’ या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर फक्त ५९९ रुपये ठेवण्यात आल्यामुळे जे आतापर्यंत विमानात बसले नाही आणि या आयुष्यात तरी हे परवडेल का? असा प्रश्न ज्यांना सतावत असेल त्यांनी या तिकिटसाठी घाई केलीच पाहिजे. ही नवी आकर्षक योजना १ जुलै ते २४ ऑक्टोबर २०१५ दरम्यान लागू केली जाणार असून यासाठी तिकीट आरक्षित करण्यासाठी शुक्रवारपर्यंत म्हणजेच १३ फेब्रुवारीपर्यंत अवधी आहे. या नव्या योजनेनुसार देशांतर्गत विमान प्रवासासाठी तुम्हाला केवळ ५९९ रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तीन हजार ४९९ रुपये मोजावे लागतील. या योजनेअंतर्गत हैद्राबाद- विजयवाडा, दिल्ली – डेहराडून, गुवाहाटी – कोलकाता, अहमदाबाद – मुंबई आणि बंगळूरु – हैद्राबाद हा विमान प्रवास केवळ ५९९ रुपयांत करायला मिळणार आहे.
