आता शाओमीचे ही ऑनलाईन स्टोअर

xiaomi
मुंबई: भारतीय बाजारपेठेत शाओमीचा एमआय४ हा स्मार्टफोन धुमाकूळ घालत असतानाच, शाओमीने यापुढे स्वतःच्या ऑनलाईन स्टोअरवरुन विक्री करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शाओमीच्या फोन्सची आतापर्यंत फ्लिपकार्टवरुन विक्री सुरु होती. शाओमी ‘Mi.com’ हे स्वतःचे ईकॉमर्स स्टोअर लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतात विक्रमी विक्री झाल्यामुळे शाओमीने हा निर्णय घेतला आहे. कॅश ऑन डिलेव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंटबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र फ्लिपकार्टवरुनही शाओमीची विक्री सुरुच राहणार आहे.

Leave a Comment