३७ लाखांची इंडियन मोटारसायकलची ‘रोडमास्टर’ बाईक

roadmaster
मुंबई : भारतात एका नव्या बाईकचे अमेरिकेतील क्रूजर बाईक तयार करणारी इंडियन मोटारसायकल कंपनीने लाँचिंग केले असून या नव्या बाईकचे नाव रोडमास्टर असे आहे.

roadmaster1

रोडमास्टरची जमेची बाजू आकर्षक डिझाईन, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण बाईकची बांधणीही आहे. ४२१ किलो वजनाची रोडमास्टर ही बाईक असून १३८.९ एनएमचा टॉर्क तयार करणारे ‘थंडर स्ट्रॉक १११’ हे इंजिन या बाईकला आहे. शिवाय तीन हेडलाईट्स, लेदर सीट्स, वींड शिल्ड इत्यादी बाईकच्या सुंदरतेत भर पाडणारे आकर्षक फीचर्स आहेत. काळा, लाल आणि क्रीम कलरमधील बाईक इंडियन मोटारसायकलने बाजारात आणल्या आहेत.

तब्बल ३७ लाखांच्या घरात रोडमास्टरची किंमत असणार आहे. भारतात सध्या हार्ले डेविड्सन, ट्रायंफसारख्या बाईकना बाजारात मागणी आहे. मात्र रोडमास्टरच्या लाँचिंगमुळे भारतातील ऑटो क्षेत्रात इतर बाईकना मागे टाकण्याची शक्यता आहे.

Leave a Comment