भारतीय हॅकरला सिंगापूरमध्ये कारावास

hacker
सिंगापूर : मुळचे भारतीय असलेले जेम्स राज अरोक्यसामी यांना सिंगापूर येथील सत्तारुढ असलेला पक्ष आणि निवडणूक आयोगांसह इतर सात संघटनांची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी तब्बल ५६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जेम्सने पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर एका विशेष सॉफ्टवेयरच्या माध्यमातून हल्ला केला होता.

जेम्स राज अरोक्यसामी याने सिटी हार्वेस्ट चर्च, पीपल्स एक्शन पाटी, नगर परिषद, स्थानिक वृत्तपत्र स्ट्रेट टाईम्सचे ब्लॉग आणि स्टैंडर्ड बैंकेशी संबंधित असलेले सव्र्हर हॅक केले होते. सर्वाधिक साइटसवर जेम्सने धमक्या आणि निंदात्मक मजकूर टाकला होता. न्यायाधिश जेनिफर यांनी जेम्सच्या गुन्हेगारीला अधोरेखित करताना म्हटले आहे की, पोलिसांकडून सायबर गुन्हेगारीप्रकरणी तपासासाठी जवळपास २ हजार ४६५ तास खर्चले आहेत. अंतिम सुनावणीनंतर निर्णय देताना म्हटले आहे की, अशा परिस्थितीत दहशतवाद्यांचा धोका अधिकच वाढला आहे. अशा नेटवर्कवर अधिक अवलंबून असलेल्या सिंगापूरसारख्या देशासाठी हा सायबर हल्ला अधिक धोकादायक आहे.

Leave a Comment