
जेनोआ : जगातील सर्वात मोठे शिप सुट रिजेंट सेव्हन सीज प्रवाशांसाठी आणत असून ते आकाराने ३ हजार ८७५ स्क्वेअर फुटच्या एका टाऊनहाऊसबरोबरच असेल. यास रिजेंट सूट असे नाव देण्यात आले आहे. पुढील वर्षी सेव्हन सीज एक्सप्लोरर जहाजमध्ये लॉन्च केले जाणार आहे. जहाजात प्रवासासाठी ४ फेब्रुवारीपासून आरक्षणाची सुविधा सुरु केली जाणार आहे. सेव्हन सीज एक्सप्लोरर १४ दिवस आपल्या प्रवाशांना मॉन्टे कार्लो ते व्हेनिसपर्यंत प्रवास घडवून आणणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तिला ४० लाख रुपये मोजावी लागणार आहे. जहाजमध्ये प्रवाशांसाठी स्पा ट्रीटमेंटची सुविधाही उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त डिलक्स सूट आणि पेंटहाऊसची उत्कृष्ट पर्याय राहिल. किंमतीचा विचार केल्यास ते स्वस्त आहे.
रिजेंट सेव्हन सीजचे जगातील सर्वांत आरामदायी जहाज!
सेव्हन सीज एक्सप्लोररचे वजन ५६ हजार टन असेल आणि त्यात ७५० लोक प्रवास करु शकतील. रिजेंटला जगातील सर्वात आरामदायी प्रवाशी जहाज तयार केले जाणार आहे. जुलै २०१४ पासून इटलीच्या जेनोआ येथे जहाजचे बांधकाम चालू आहे. पुढील वर्षी रिजेंट सेव्हन सीज क्रूजेससह सहभागी होईल.
