आता ‘अॅमेझॉन’ही देणार ‘ई-मेल’ सेवा

amazon
वॉशिंग्टन : ऑनलाइन व्यवसायातील अग्रेसर असलेल्या ‘अॅमेझॉन’ नेही विस्ताराची मोहीम हाती घेतली असून, लवकरच ‘क्लाउड’ वर आधारित ई-मेल आणि कॅलेंडर सेवा कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलूक आणि अन्य ई-मेल सेवा देणा-या कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्याच्या उद्देशाने ‘अॅामेझॉन’ ने हे पाऊल उचलले आहे.

ही ई-मेल सेवा ‘अॅेमेझॉन वर्कमेल’ या नावाने ओळखली जाणार आहे. या सेवेद्वारे ई-मेल स्वीकारणे, पाठवणे, कॉन्टॅक्ट नियंत्रित करणे, कॅलेंडर शेअरिंग आदींचा लाभ ‘यूजर्स’ ना घेता येणार आहे. या शिवाय आउटलूक आणि गुगल अॅ्प्सच्या माध्यमातून देणा-या सर्व सेवांचा लाभ या मेल सेवेद्वारे घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात कॉर्पाेरेट ग्राहकांवर; जे सध्या मायक्रोसॉफ्ट आउटलूक आणि अन्य सेवा पुरवठादाराची सेवा घेत आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

अॅ्मेझॉनतर्फे ही सेवा प्रामुख्याने ‘अॅणमेझॉन वेब सव्र्हिस’ या क्लाउड युनिटवरून प्रदान करण्यात येणार असून, दरमहा प्रति यूजर चार डॉलरचे शुल्क त्यासाठी आकारण्यात येणार आहे. प्रत्येक ग्राहकाला स्टोरेजसाठी ५० जीबी क्षमतेचा मेलबॉक्सही देण्यात येणार आहे.

फक्त मेलबॉक्सच्या निर्मितीसाठीच यूजरना शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती अॅगमेझॉनतर्फे प्रसारित करण्यात आली. गेले कित्येक दिवस ग्राहकांकडून आमच्याकडे बिझनेस ई-मेल आणि कॅलेंडर सेवेसाटी विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार आम्ही ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष पीटर डे सँटिस यांनी दिली.

Leave a Comment