आता ‘व्हॉट्‌स ऍप प्लस’

whatsapp
मुंबई – स्मार्टफोन आल्यापासून विविध ऍप आपल्या मोबाईलचा पिछा सोडत नाही. पण आता त्यात आणखी एका ऍपची भर पडणार आहे. ते म्हणजे ‘व्हाट्‌स ऍप प्लस’.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्‌स ऍप सध्या एका नव्या मॅसेजरवर काम करत असून ते ‘व्हाट्‌स ऍप प्लस’ असे असेल. यात खास म्हणजे काही नवीन स्माइली असतील. ज्या आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करू शकतील. तसेच यात नव्या थीम्सचे पण पर्याय असणार आहे जे आपल्या मूडनुसार आपण बदलू शकाल. यासोबतच ‘व्हॉट्‌स ऍप प्लस’ मध्ये मॅसेंजरद्वारे मोठी फाईल शेअरिंग करण्याचे ऑप्शन असेल. व्हॉट्‌स ऍपच्या चाहत्यांना या नव्या व्हॉट्‌स ऍप प्लसची खूप उत्सुकता आहे.