गरीब अफ्रिका खंडात जगातील सर्वाधिक श्रीमंत माणूस !

musaa
अफ्रिका : जगाच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत माणूस हा गरीब समजल्या जाणा-या अफ्रिका खंडात राहात होता हे आपल्यापैकी फार थोड्या लोकांना माहित असेल. होय, अफ्रिका खंडातील बहुतेक देशात धर्म आणि जातीवर आधारित नायजेरिया, माली, रवांडा, युगांडा आणि सूदानसारख्या देशात रक्ताचे पाटच वाहत असतात. अशा या प्रदेशात १३ व्या शतकात माली साम्राज्याचा एक राजा मंसा मुसा (प्रहिला) राज्य करीत होता. सेलेब्रिटी नेटवर्थ वेबसाईटच्या माहितीनुसार, या राजाकडे ४०० बिलियन डॉलरर्स इतकी संपत्ती होती. आजचे मूल्य पहाता हा राजा पृथ्वीवरील मानवी इतिहासातील सर्वांत श्रीमंत मानला जातो.

१३३१ मध्ये मृत्यूच्या वेळी या राजाकडे त्याची व्यक्तिगत संपत्ती आजच्या भारतीय चलनानुसार २,४६,१५,९८,००,००,००० रुपये इतकी होती. हे असे आहे जसे मोजून मोजून तुम्ही संपून जाल. या राजाचा देश संपूर्ण जगातील निम्म्यापेक्षा जास्त सोन्याचे उत्पादन करायचा. त्याने खूप मोठ्या मोठ्या मशिदी बनविल्या ज्या आजही उभ्या आहेत. मुसाच्या मृत्यूनंतर त्याचा व्यवसाय व संपत्ती पुढील पिढी सांभाळू शकली नाही. याबाबत सांगितले जाते की, विदेशी फौजांचे आक्रमण व अंतर्गत युद्धात या राजाच्या संपत्तीची लूट करण्यात आली.

Leave a Comment