
मुंबई: सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा असा अॅपल आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस फोन आहे. पण आता चीनच्या एका कंपनीने या बहुचर्चित फोनला २४ कॅरेट सोन्याने मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवले आहे.
सोन्याने मढविलेला आयफोन ६ आणि आयफोन ६+
आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस फोनचे गोल्ड प्लेटेल वर्जन चीनच्या एका कंपनीने लॉन्च केले आहे. हा फोन कंपनीच्या लिमिटेल अॅडिशन अंतर्गत उपलब्ध होईल. गोल्ड प्लेटेड फोनची मागची बाजू कार्बन फायबर फर्निश असेल. फोनचे फीचर्स आणि इतर हार्डवेअरमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही. या फोनची किंमत अजून कंपनीने जाहीर केलेली नाही.
